CoronaVirus | कोरोना विषाणूची साथ जाणून घेऊ काही
अंतराष्ट्रीय स्तरापासून ते जिल्हा पातळीपरीयंत कोरोना व्हायरसबाबत जगजागृती केली जात आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचेही प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काय आहे?, कोरोना विषाणू कसा पसरतो?, कोरोनाबाबत समज-गैरसमज काय आहेत? याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने महत्त्वाची माहिती जारी केली आहे, ती जाणून घेऊया आणि आपल्या परिवार, मित्र, मैत्रीण याना लवकरात लवकर share करा:
काय आहे कोरोना?
- हा एक विषाणू आहे.
- तो वेगाने वाढतो
- वेगाने एका व्यक्तीकडून दुसर्याकडे पसरतो
- आपल्या श्वसनसंस्थेला बाधित करतो.
(Corona Virus) कोरोना विषाणू कसा पसरतो?
कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो:
- रुग्णाच्या खोकल्यातून
- वस्तूंच्या स्पशार्तून
1.रुग्णाच्या खोकल्यातून
- रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात
- हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात
- या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात
- आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसगर् होतो.
2. वस्तूंच्या स्पशार्तून
- रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात.
- त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पशर् झाल्यावर ते विषाणू हातांना चिटकतात.
- त्यानंतर जर हात चेहर्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमागार्तून जाऊन संसगर् होतो.
Corona आजाराची लक्षणे:
- सर्दी
- घसा तीव्रपणे दुखणे
- खोकला
- ताप
- श्वास घेण्यास त्रास होणे
- डोकेदुखी
- उलट्या व जुलाब
धोकादायक लक्षणे
- तीव्र घसादुखी
- ३८ अंशापेक्षा जास्त ताप असणे.
- धाप लागणेछातीत दुखणे,
- खोकल्यावाटे रक्त पडणे,
- रक्तदाब कमी होणे,
- नखे निळसर काळी पडणे.
- मुलांच्यामध्ये चिडचिड आणि झोपाळूपणा वाढणे.
कोरोनाचा जास्त धोका कुणाला?
- गरोदर माता
- उच्च रक्तदाब,
- मधुमेह,
- मूत्रपिंडाचे विकार,
- ककर्रोग,
- दमा,
- जुना व सतत बळावणारा खोकला,
- ककर्रोगाचे उपचार चालू असल्यास.
आजाराची शंका आल्यास काय करावे?
- आजाराची शंका आल्यास वेळ न दवडता मान्यताप्रत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जवळच्या सरकारी इिस्पतळात जाऊन ‘कोरोना विषाणूच्या निदानाची तपासणी करून घ्या.
- डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा.
- ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका.
- अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका.
- तोंडाला रुमाल अथवा मास्क लावा. सतत Dettol नि हात धूत राहा.
आजार टाळण्यासाठी काय करावे?
- डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा
- गर्दीचे ठिकाणे टाळा
- चेहर्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
- सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत.
- खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरावा.
- टिशू पेपर वापरल्यानंतर लगेच कचरापेटीत टाकून द्यावा.
- खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, त्याऐवजी कोपर वाकवून ते तोंडासमोर धरावे.
- ताप किंवा खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा.
- तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.
- प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पशर् करू नये.
- पूर्ण शिजवलेले शाकाहारी / मांसाहारी अन्न खावे
- चिकन , मटन प्रमाणित दुकानातूनच घ्यावे
- तीन लिटर पाणी रोज घ्यावे
- पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत
- धूम्रपान टाळावे
- मद्यपान टाळावे.
कोरोनाबाबत गैरसमज व अफवा:
- चिकन, अंडी खाऊ नयेत
- चीनमधून आयात झालेल्या गोष्टी वापरू नयेत.
- लसूण खाल्याने कोरोना विषाणूंचा संसगर् होत नाही
- भारत सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार काही ‘आयुष’ औषधे कोरोना आजार रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- कोरोना विषाणूचा संसगर् झाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडतो.
- धूम्रपान व मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला कोरोना होत नाही.
लक्ष्यात ठेवा
- कोरोना विषाणूचा संसगर् झाल्याची शंका अली तर घाबरु नका.
- त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
- कोरोना विषाणूची साथ लवकरच पूणर् आटोक्यात येईल.
- Corona Virus जनजागृती प्रीत्यथर् प्रसारित, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
No comments