101+ Latest नवरी साठी उखाणे | Marathi Ukhane For Bride


101+ Latest नवरी साठी नवीन उखाणे |  Marathi Ukhane For Bride

Here we have shared best Marathi Ukhane for Bride (नवरी साठी नवीन उखाणे). As a tradition These Marathi ukhane are used while wedding in all over Maharashtra which is called as Naav Ghene. These ate best and unique ukhane for bride | नवरी मुलीचे उखाणे. Please share with your friends and family. In this tradition Groom/Bride introduces His wife/her Husband by taking her name in some poetic Marathi language. 

These are ukhane in marathi for female marriage, ukhane in marathi for female, ukhane in marathi for male comedy, ukhane in marathi for female comedy, ukhane in marathi for female sankranti,ukhane in marathi for girlfriend, ukhane in marathi for girl.

 

नवरी साठी नवीन उखाणे |  Marathi Ukhane For Bride:




खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद 


वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
...रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड


शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...रावांचे नाव घेते सासरच्या घरात


पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
...रावांचं नाव घेते ...ची सून
 

समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
...करता माहेर केले मी दूर

 
अरबी समुद्रात उसळल्या लाटा
...च्या सुख-दुःखात माझाही वाटा

 
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते ऐका देऊन कान
 


कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,
राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती


राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला


मंदिरात वाहते, फुल आणि पान,
रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान


लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती


गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी


डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल


कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
रावांचे नांव घेते, सारे जण बसा


मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने



पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती


माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे


संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला


अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
रावांच नांव घेताना, कसला आला आळस


पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते


ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल


लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा


पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार


आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
राव हेच माझे अलंकार खरे


अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी


सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान


दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
चे नाव घेते तुमच्या साठी!

  • ukhane in marathi for female marriage
  • ukhane in marathi for female
  • ukhane in marathi for male comedy
  • ukhane in marathi for female comedy
  • ukhane in marathi for female sankranti
  • ukhane in marathi for girlfriend
  • ukhane in marathi for girl
  • ukhane in marathi for husband



श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन
घातली मी वरमाला हसलेराव गाली,
थरथरला माझा हात लाजेने चढली लाली


जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,
घडविले दैवांनीरावांना जीव लावून


हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत


राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार


पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,
रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन


चांदीचे जोडवे पतीची खूण,
.. रावांचे नांव घेते,… ची सून


गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे


डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले


चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा


नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे


स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,
रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी


रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा


तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
रावांचे मन, मी केव्हाच जिंकले


मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
रावांचे हेच रूप मला फार आवडले


मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा


शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,
रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन



  • ukhane in marathi for female marriage
  • ukhane in marathi for female
  • ukhane in marathi for male comedy
  • ukhane in marathi for female comedy
  • ukhane in marathi for female sankranti
  • ukhane in marathi for girlfriend
  • ukhane in marathi for girl
  • ukhane in marathi for husband



प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची


चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती


नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
रावांचा स्वभाव आहे फारच उदार


करवंदाची साल चंदनाचे खोड,
रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड


सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले


सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
...रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले


प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात



शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी



मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर




Gamtidar Ukhane in Marathi | गमतीदार उखाणे:


परसात अंगण अंगणात तुळस

—– नाव घ्यायचा मला नाही आळस


पायी पैंजण चालू कशी, गळ्यात हार वाकू कशी
.................
राव बसले मित्रांपाशी , मोठ्याने हाक मारू कशी.


दसऱ्याला केले शस्त्र पूजन , नवरात्रात पुजली अंबिका
..................
राव शरद ऋतूतील चंद्र , अन मी चंद्रिका



केली देते सोलून, पेरू देते चिरून
..................
रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.



इंग्रजीत  चंद्राला  म्हणतात   मून
...........
रावांचे  नांव  घेते  ,.................घराण्याची सून.



अगीचे  में  बगीचा  ,बगीचे  में  बंदर
............
राव  मेरे , दिल  के  अंदर



चांदीची  कळशी  घासू  कशी 
..........रावंच  नाव  घेऊ  कशी  


महादेवाच्या  पिंडीला  नागाचा  वेढा
..................रावांना  भरवते  मी  पेढा  


चांदीची  वाटी  गुलाबाने  घासली 
...............रावांच  नाव  घेता  राधा-कृष्ण  हसली 


मंगळसूत्राच्या  दोन वाट्या , सासर - माहेर  खून 
........................रावांच  नाव घेते .............घराण्याची  सून .


लाल  मनी  तोडले, काळे  मनी  जोडले 
.....................रावांसाठी  आई-बाप  मी  सोडले.



संसाराच्या  मंदिरात  नंदादीप  तेवतो  मंद
................
रावांच्या  मुळे  जीवनात  भरला  सुगंध


मंगलदिनी, सोन्याच्या  क्षणी  हार घालते  एका मेका 
...............रावांच्या  सौभाग्याने  नाव घेते  ऐका


वन  बॉटल, टू  ग्लास
    .......................इज  फर्स्टक्लास


सासू  माझी  प्रेमळ , दीर्  माझा  हौशी  
................रावांच  नाव  घेते  सणासुदीच्या  दिवशी .


शेवग्याची  शेंग  झुलते  वाऱ्यावर 
............रावांचे नाव  घेते  शेजारणीच्या  नाकावर

ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट, बघितल तिला आणि पड्ला माझा विकेट.

लग्नात्त लागतात हार आणि तुरे
. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे

आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची…….
म्हणजे जगदंबा

सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकुन् .चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन

साखरेचे पोते सुई ने उसवले,
..ने मला पावडर लाऊन फसवले

रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
इज माय फस्ट आणि लास्ट

एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.

खोक्यात खोका टिविचा खोका, मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

एक होति चिउ एक होता काउ
……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
. नाव घ्यायला मला नाही आळस्.

एक किलो गहु वर एक किलो गहु,
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना . मला चावली.

Gamtidar ukhane | गमतीदार उखाणे


नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

घास घ्यायला तयार आहे ——– लेक्
मोठा करते - तु दुरुन फेक
अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव

गोड करंजी सपक शेवाई …… होते समजूतदार म्हणून ……. करून घेतले जावई

नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या
भरपुर चुका,
..चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
ला पाहून माझ डोक दुखत.

केऴिच पान टर टर फाटत रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.

वन बोटल टू ग्लास राव् आमचे फस्ट क्लास्

शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा

महादेवाच्या पिडिंवर बटाट्याची फोड्,रावांना डोळे मारण्याची लई खोड्.
इंद्रधनुचे असतात सात रंग, वर-वधुही सप्तपदीत असतात दंग.संगिताचे असतात सात सुर……राव् बसलेत माझ्यापाऩ दुर्

जुईचि वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
च्या जीवावर करते मी मजा

काचेच्या ग्लासात कोकम सरबत
.रावांशिवाय मला नाही करमत

Gamtidar ukhane | गमतीदार उखाणे


कपात कप बशीत बशी ||||
. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.

अत्ततराचि बाट्ली कचकन फुट्ली..नाव घ्यायला लाज नाही वाट्ली ……

चांदीच्या परातित केशराचे पेढे..आमचे हे सोडुन सगळे वेडे

खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते;घड्याळात वाजले तीन ……ची वाट पाहाते ..ची सुन्.



These are ukhane in marathi for female marriage, ukhane in marathi for female, ukhane in marathi for male comedy, ukhane in marathi for female comedy, ukhane in marathi for female sankranti,ukhane in marathi for girlfriend, ukhane in marathi for girl. If you know any other unique “Marathi Ukhane for Bride” then please submit comment in Comment Section below

No comments

Powered by Blogger.