Don maase ani Ek Beduk - Marathi Goshti | दोन मासे आणि एक बेडूक
Don maase ani Ek Beduk - Marathi Goshti | दोन मासे आणि एक बेडूक | Read here latest and Funny Marathi Goshti. We provided best collection of Marathi Goshti or Marathi stories. This Story is between 2 fish and a frog. Share and enjoy our Don maase ani Ek Beduk - Marathi Goshti | दोन मासे आणि एक बेडूक- Marathi Goshti
दोन मासे आणि एक बेडूक:
एका मोठय़ा तलावामध्ये सहस्र्बुद्धी आणि
सातबुद्धी हे दोन मोठे मासे राहत होते. बुद्धी नामक बेडूक या दोन्ही
माशांचा जवळचा मित्र होता. ते तलावाच्या काठावर एकमेकांशी बराच वेळ घालवत
असत. एके दिवशी संध्याकाळी ते तलावाच्या काठावर एकत्र जमले असता, त्यांनी
काही मासेमारांना येताना पाहिले. त्यांच्याकडे मोठय़ा जाळ्या व टोप-या
होत्या. त्या माशांनी पूर्णपणे भरलेल्या होत्या.
मासेमारांना तलावातून जाताना पाहिले की,
तलावामध्ये मासे भरलेले आहेत. त्यातील एकाने इतरांना सांगितले, ‘आपण उद्या
सकाळी इथे येऊ. हा तलाव फारसा खोल नाही आणि माशांनी भरलेला आहे. आपण या
तलावात कधीही मासे पकडले नाहीत.’ दुस-या दिवशी सकाळी परत येण्याचे त्यांनी
ठरवले आणि आपला प्रवास चालू ठेवला.
मासेमारांचे हे शब्द ऐकल्यानंतर बेडूक
निराश झाला आणि म्हणाला, ‘मित्रा, आपण काय करावे, कोठे जायचे किंवा लपावे,
हे आपण ठरविलेच पाहिजे. हे मासेमार उद्या सकाळी परत येतील!’ माशांना
मासेमारांची फारशी काळजी नव्हती. पहिला मासा म्हणाला, ‘मित्रा, ही काही
मासेमारांची चर्चा आहे. काळजी करू नका. कारण ते येणार नाहीत आणि ते आले
तरीसुद्धा मला खूप खोल पाण्याचे सुरक्षित स्थान माहीत आहे. मी
त्यांच्यापासून स्वत:ला आणि माझ्या कुटुंबाचे सहज संरक्षण करू शकतो.’ दुसरा
मासा म्हणाला, ‘मला पण खोल पाण्यामध्ये एक सुरक्षित स्थान माहीत आहे. मी
स्वत:ला आणि माझ्या कुटुंबालाही वाचवू शकेन. मी तुझ्या पाठीशी आहे. काही
मासेमारांच्या म्हणण्यानुसार आमचे पूर्वज व पूर्वजांचे घर सोडणार नाही.’
पण बेडकाला खात्री नव्हती, तो म्हणाला,
‘माझ्या मित्रा, माझ्यात एक कौशल्य आहे की, मी धोक्याची अपेक्षा करू शकतो.
तुम्ही राहू शकता, पण मी माझ्या कुटुंबीयांसह पहाटे पूर्वी दुस-या तलावात
जाईन.’ दुस-या दिवशी सकाळी मच्छीमार येऊन तलावामध्ये सर्व जाळी टाकतो आणि
त्यांनी बरेच मासे, बेडूक, कासव आणि खेकडे पकडतो. सहस्र्बुद्धी आणि
सातबुद्धी हे त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण
त्यांचे प्रयत्न अपुरे ठरतात. सर्व माशांना पकडून मासेमार त्यांना घेऊन
जातात. पाण्याबाहेर आल्यानंतर सर्व मासे मरून जातात. सहस्र्बुद्धी आणि
सातबुद्धी हे दोन मोठे मासे मिळाल्याने मासेमारांना मोठा आनंद झाला.
बुद्धी या बेडकाला आधीच आश्रयासाठी तलाव
सापडला होता. पण त्याला आपल्या मित्रांची काळजी वाटत होती. त्यामुळे तो
त्यांना बघण्यासाठी जमिनीवर आला. पण मासेमार आपल्या मित्रांसह जाताना
पाहताच तो निराश झाला. बेडकाने त्याच्या पत्नीला सांगितले की,
‘सहस्र्बुद्धी आणि सातबुद्धी खूप हुशार होते. परंतु, त्यांच्यामध्ये
प्रतिभेची कमतरता होती. त्यांनी त्यांच्यातील कमी ओळखली नाही. माझ्याकडे
एकच एकच कौशल्य आहे. मी संभाव्य धोका ओळखला. आता मला माझ्या कुटुंबासमवेत
आनंदाने पोहायचे आहे.’
No comments